बबलगम



आधी बाबा
देतात दम
मग आणतात
बबलगम!

आधी बाबा
देतात छड़ी
मग चोकोलेटची
मिळते वडी!

आई घेते
वाचून धडा
मग देते
बटाटावडा!

कवी - मंगेश पाडगांवकर

Post a Comment

0 Comments