
गोल गुबगुबीत मांजर
नजर तिची दुधावर
स्वयंपाक घरात घेतली धाव
मजेत मारला दुधावर ताव
कुणाचीतरी लागली चाहूल
हळूच काढले तेथून पाऊल
पाठीत बसली सणकन छडी
खिडकीतून घेतली धपकन उडी
शिक्षा मिळाली तोडीस तोड
दूध पिण्याची मोडली खोड
0 Comments