एक गवात एक न्हावी राहत असतो . त्याचे नाव शाम न्हावी असते. शाम खूप चतुर पण गरीब होता. शामला जमीन खूप कमी होती. त्यामुळे त्याचे घर खर्च भागत नवते. गाव छोटे असल्यामुळे त्याला शेजारच्या गावात आपला धंदा सुरू करावा लागला होता. त्याने शेजारच्या गावात एका लिंबाच्या झाडा खाली आपले छोटे दाडी-डोकी चे दुकान टाकले.

सकाळी लवकर उठायचे आणि शेजारच्या गावात कामासाठी जायचे. त्याचा हा दररोज च हा दीनंक्रम बनला होता. शेजारच्या गावात जाण्या साठी वाटात येक छोटे पण भयानक जंगल लागायचे. एक दिवस शाम आपल्या दररोज च्या डिंनक्रमा नुसार सकाळीच कामावर गेला जाताना त्याला जंगलाच वातावरण काही बारे वाटले नाही. शाम कामावर गेला आणि दिवसभर काम करून संध्याकालच्या वेळी तो घराकडे निघाला घराकडे जात असताना जंगलात त्याला आपला पाटलाग कोनतरी करत आहे याचा भास झाला. पण त्याला वाटले की माझ्या मनाचा भास होत असेन. काही पाऊल अंतर पुढे गेल्या नंतर त्याला मागून आवाज आला की "हा.. हा.. हा.. हा.. थांब कुठे चाल्ला. माला खूप भूक लागली आहे अन मी आत तुला खाणार आहे. "

आता हे ऐकून शाम घामा-घूम झाला होता. त्याला वाटले की आता आपले काही खरे नाही. आपल्याला हे भूत खाऊन टाकणार. थोड्याच वेळात ते भूत शमच्या पुढे आले आणि जोरा-जोरात हसू लागले. आता शाम ची बुद्धी कामा येणार होती. शाम न घाबरता बोलला की मी भूतांना माझ्या आरशात पकड्तो आणि आरसा नदीत फेकून देतो अन मी तुला पण तसेच करणार. भुताला हे काय खरे वाटले नाही. आणि ते बोलले की माला नको सांगू तुझे हे फसवे वाक्य, मी नाही फसणार. शामणे आपल्या पिशवीतून आरसा कडला आणि आरशाचे  तोंड भुता कडे केले आता भूतला आपले प्रतिबिंब शामच्या हातात असणार्‍या आरशात दिसले. आता भुताला वाटले की आपल्याला खरोखर या माणसाने पकडले आहे. भूत घाबरले आणि शाम कडे आपल्या प्राणांची भीक मागायला लागले . भूतला हे माहीततच नवते की आरशात आपले प्रती बिंब आहे. शाम त्या भूतला बोलला की तू जर हे जंगले सोडले तरच मी तुला सोडेन. भूत बोलले की "ठीक आहे . " आणि गायब झाले. आता शामला भीती नाही तर खूप हसायला येत होते. शाम घरी जाऊन ही सगळी गोष्ट त्याचा बायकोला सांगू लागला.

तात्पर्य:- समोर आलेल्या संकटाला न भिता सामोरे जावे